जाणून घ्या.. या कोरोनाकाळात नवरात्रोत्सव कसा असणार ? गरबा आणि दांडियाचं काय?

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त नियम पाळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आता नवरात्रोत्सव लवकरच सुरु होईल, त्यामुळे नागरिकांच्या मनात गरबा आणि दांडियाचं काय हे आणि असे अनेक प्रश्न आहेत.. यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे.
सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदा गरबा, दांडिया अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. कारण यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे. कोविड-19 संकट लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगच्या नियमावलीचं पालन करावं, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिम प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. यंदा शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790