नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी परिसरात राहणाऱ्या चौघा संशयितांनी आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर दुखापत केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कैलास पन्हाळे (वय २६, रा. बजाज शोरूमच्या मागे, म्हसरूळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते स्वतः संशयित कुणाल पाटील (रा. कालिका नगर, पंचवटी), रवी मधुकर येलमामे (रा. वैशाली नगर, पेठरोड, पंचवटी), गोकुळ मधुकर येलमामे (रा. वैशाली नगर, पेठरोड, पंचवटी) आणि गोपाल संजय गोरे (रा. अवधूत नगर, पंचवटी) यांच्यासोबत शनिवारी (दि.२१) रात्री १० वाजेच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्यावेळेस चेष्टा-मस्करी सुरु होती. तेव्हा कुणाल पन्हाळे याने चेष्टा-मस्करीमध्ये कुणाल पाटील याचे डोके धरून हलविले. याचा कुणाल पाटीलला राग आला म्हणून त्याने इतर मित्रांशी संगनमत करून कुणाल पन्हाळे याला शिवीगाळ केली. तसेच संशयित गोपाल गोरे याने तेथे पडलेला दगड उचलून कुणाल पन्हाळे याच्या नाकावर आणि चेहऱ्यावर दुखापत केली.