
चांगली बातमी: पंचवटी एक्स्प्रेसचे इतके डबे आता होणार जनरल
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे.
कोरोनाकाळात रेल्वेने काही बदल केले होते.
परंतु, आता संसर्ग ओसरल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे २० पैकी ९ डबे हे जनरल करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
नाशिक शहरासाठी पाच तर मनमाडसाठी सहा डबे सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. एका वातानुकूलितसह आणखी दोन डबे पासधारकांसाठी तर एक महिलांसाठी राखीव आहे.
मनमाड ते मुंबईदरम्यान धावणारी ‘पंचवटी’ ही जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली कॅम्प, इगतपुरी येथील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण आहे. तिला एकूण २० डबे असून त्यामध्ये दाेन प्रथम वर्गाचे वातानुकूलित डबे असून पैकी एक डबा हा पासधारकांसाठी राखीव आहे. मनमाडसाठी सहा डबेे साधारण असून एक मासिक पासधारकांसाठी तर एक डबा हा महिलांसाठी राखीव आहे. तसेच नाशिकसाठी पाच डबे साधारण असून यामध्ये एक डबा हा मासिक पासधारकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित डबे हे आरक्षित राहणार आहेत.
नाशिक: सावकारांच्या जाचाला इसमाची कंटाळून आत्महत्या
नाशिक: एसटी संप जीवावर बेतला! आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या