चरातील अडथळे दूर करून नंदिनी नदीतील पाणी प्रवाहीत करण्याची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): चरातील अडथळे दूर करून नंदिनी नदीतील पाणी प्रवाहीत करावे, संपूर्ण पात्राची स्वच्छता करून किनारे सुशोभित करावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना याबाबतचे निवेदन २८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये नंदिनी नदीतील पाणी प्रवाहीत राहावे यासाठी चर खोदण्यात आले आहेत.
गाळ साचल्याने, दगड, वीटा, मातीमुळे या चराला अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पाणी त्याच ठिकाणी साचून राहते. परिणामी, हे ठिकाण डासांचे उत्पत्तीस्थान झाले आहे.
मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, बाजीरावनगर, गोविंदनगर, सद्गुरूनगर, उंटवाडीसह नदीकाठच्या परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर साथीचे आजार वेळोवेळी पसरतात. चरातील गाळ, दगड, वीटा, गोटे, इतर घाण रोबोट मशीनने काढल्यास चरातील पाणी प्रवाहीत होईल.
डासांची उत्पत्ती कमी होवून नागरिकांच्या आरोग्याचा धोका कमी होईल. दोंदे पुलापासून पुढे गोविंदनगरपर्यंत नंदिनी नदीतील चराची स्वच्छता करावी. दोंदे पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, त्यास प्रतिबंध यावा म्हणून रस्त्यालगत या ठिकाणी पेव्हरब्लॉक बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी, २८ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि सार्वजनिक बांधकामचे शहर अभियंता नितीन वंजारी यांना देण्यात आले आहे.
शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, ज्योती वडाळकर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, श्याम अमृतकर, दिलीप दिवाने, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, संजय बाविस्कर, यशवंत जाधव, बाळासाहेब राऊतराय, मनोज वाणी, निलेश ठाकूर, मकरंद पुरेकर, कांतीलाल उबाळे, सुनिता उबाळे, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, दीपक ढासे, मनोज कोळपकर, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनील चौधरी, बन्सीलाल पाटील, मनोज पाटील, मोहन पाटील, बाळासाहेब दिंडे, आशुतोष तिडके, नितीन तिडके, बाळासाहेब तिडके, पुरुषोत्तम शिरोडे, राहुल पाटील, हरिष काळे, संदीप महाजन, दीपक दुट्टे, शैलेश महाजन, बापू आहेर, सचिन राणे, समीर सोनार, अशोक पाटील, ज्ञानेश्वर महाले, दिलीप रौंदळ, सुरेश पाटील आदींसह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.