कसारा घाटात ट्रकचालकाची लुट; पोलिसांवर हल्ला; थरार नाट्यानंतर दरोडेखोर ताब्यात

कसारा घाटात ट्रकचालकाची लुट; पोलिसांवर हल्ला; थरार नाट्यानंतर दरोडेखोर ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): शुक्रवारी (दि. १ एप्रिल) पहाटे साडेचारच्या सुमारास कसारा घाटात बंद पडलेल्या वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या एका चोरट्यास अर्धा तासाच्या थरारनाट्यानंतर पकडण्यास पोलिसांना यश आले.

या झटापटीत एक पोलिस जखमी झाला.

नाशिकहून मुंबईकडे जाणारा ट्रक (एमएच ४० बीजी ६१६५) हा रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरताना पाटा तुटला.

पोलिसांच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला.

गॅरेज उपलब्ध नसल्याने चालकास महामार्ग पोलिसांनी मोबाइल नंबर देत गस्तीसाठी निघून गेले. पहाटे पावणेपाचच्या सुमारास पल्सर गाडीवर तीन जण आले. त्यांनी दादागिरी करत ट्रकवर दगडफेक केली. चालकाने प्रसंगावधान राखत महामार्ग पोलिसांना कॉल केला. तोपर्यंत या तिघांनी ट्रकचालक विकी खोब्रागडे व क्लिनर निधी वासनिक यांना मारहाण करत रोख रक्कम व मोबाइल हिसकावून घेतले.

[wpna_related_articles title=”Other Important News” ids=”10321,10319,10311″]

दरम्यान, महामार्ग पोलिस माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन तेथे पोहोचले. पोलिस आल्याचे समजताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला केला. तिघांपैकी विजय ढमाळे (रा. इगतपुरी) याला हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी पकडून ठेवले. यावेळी ते जखमी झाले. आरोपीकडे असलेली दुचाकी एमएच १५ एचबी १०७५ कसारा पोलिसांनी ताब्यात घेतली. कसारा घाटात शस्त्र घेऊन लुटमार करणारी टोळी वाहनचालकांना मारहाण करत असून पोलिसांवरसुद्धा दगडफेक करत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सलमान खतीब व आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य मदतीला पोहोचले. परंतु, तोपर्यंत दोघेही पळून गेले.

महिलांचाही घाटात सुळसुळाट:
वाहन लुटणाऱ्या टोळीत महिलांचाही समावेश असून लिफ्ट मागण्याचा बहाणा करत लुटणारी टोळी कार्यरत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. मोखावणे फाटा, शिरोळ फाटा परिसरात अनेक महिला संशयास्पद स्थितीत दिसून येतात.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790