नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील उपनगर व नाशिकरोड येथील परिसरात एकत्र येत टोळीने गंभीर गुन्हे करणाऱ्या २७ सराईतांवर नाशिक पोलिसांकडून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानुसार, ११ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये ३ अल्पवयीन बालकांचा देखील समावेश आहे.
१६ नोव्हेंबर २०२० रोजी उपनगर परिसरात या टोळीने योगेश चायक (वय २३, रा.देवळाली) याचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांना तपासात मारेकरी एकत्र येऊन टोळीने गुन्हा करतात हे आढळून आले. तसेच ही टोळी पैसांसाठी गुन्हा व अवैध मार्ग अवलंबते व सोबतच दहशत पसरविण्याचा प्रयत्न करते. तर दुसऱ्या बाजूला महिला व व्यावसायिकांच्या मनात देखील भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करते असे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ११ जणांना अटक करण्यात आली असून, १३ संशयित फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. तर, ३ अल्पवयीन गुन्हेगार असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामध्ये टोळीप्रमुख सागर म्हस्के उर्फ सानू पाईकराव (वय २२), रोहित लोंढे (वय २१), मारुती घोरपडे (वय १८), राहुल तेलोरे (वय १९), कलाम सलीम (वय १९), सत्तू राजपूत (वय २०), हर्ष म्हस्के (वय २८), योगेश बोडके (वय २३), साहिल म्हस्के (वय २०), अमन वर्मा (वय ३५) यांना अटक केली आहे. तर, नाशिकच्या अक्षय पारचे (वय २१), संदीप सुंदरलाल (वय २३), अजय लोहट, विजय बहेनवाल, अनुज बहेनवाल, शिबान शेख, गोलू, बॉबी, विनोद, आतिष तसेच उल्हासनगरच्या पप्पू वाघ, चेतन वाघ, कल्याण येथील नासिर व ३ अल्पवयीन संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790