
अमोल इघे खूनप्रकरणी मुख्य आरोपीला सहा तासांत अटक !
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा शुक्रवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी खून करण्यात आला होता.
कंपनीमध्ये युनियन लावण्याच्या वादावरून हा प्रकार घडला होता.
या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती.
या प्रकरणातील आरोपीना ताबडतोब अटक व्हावी यासाठी भाजपाच्या आमदार, नेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी विनोद उर्फ विनायक बर्वे नामक एकाला अटक करण्यात आलीये. आरोपीला ठाणे येथून अटक करण्यात आली असून कंपनीत युनियन लावण्याच्या वादातून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बर्वे आणि इघे हे दोघंही मित्र होते. या दोघांच्याही युनियन आहेत. इघे यांची युनियन भारतीय जनता पक्षाशी संलग्न असून बर्वे यांची संघटना राष्ट्रवादी संघटनेशी संलग्न असल्याचं बोललं जातंय. युनियन मधून मिळणारा पैसा यातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. एक महिन्यांपूर्वी बर्वे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची चर्चा असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरात या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार