…अन्यथा नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल, पोलीस आयुक्तांना भुजबळांचा इशारा

…अन्यथा नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल, पोलीस आयुक्तांना भुजबळांचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीची घटनांना ऊत आला आहे. दर दिवसाआड खुनाची घटना समोर येत आहे. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असून सर्वसामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झाले आहे.

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ कठोर शब्दांत पोलीस आयुक्ताना इशारा दिला आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबवावी अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरतील असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली आहे. रोजच मारहाण, खून, प्राणघातक हल्ले अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून एक गुन्ह्याची उकल होत नाही, तोच दुसरा गुन्हा घडत आहे. यामुळे नाशिकचे वातावरण बिघडत चालले आहे. आता यात अल्पवयीन मुले देखील गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. अशातच छगन भुजबळ यांनी याबाबत महत्वाचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नाशिकच्या वाढतंय गुन्हेगारीवर आपले मौन सोडले.

छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली आहे. दर दिवसाआड खून अत्याचार, मारहाण घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन काय करतंय? जे कोणी पोलीस आयुक्त आहे, त्यांना गुन्हेगारी आवरावी लागेल नाहीतर नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल..’नाशिकच्या जनतेच्या वतीने आम्ही उठाव करू, असा इशारा भुजबळांनी दिला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

जर पोलिसांकडे कुमक कमी असेल तर त्याबाबत पाठपुरावा आम्ही देखील केला. विधानमंडळात याबाबत विचारणा केली की, पोलीस बळ कमी पडत असून गुन्हेगारी वाढली आहे, तसेच लवकरात लवकर पोलिसांची कुमक वाढवावी असे केल्याचे भुजबळ म्हणाले.

नाशिक शहरात मागच्या आठवडाभराचा विचार केला तरी दोन खून, अनेकांवर प्राणघातक हल्ले, गोळीबार, कोयता गँगची दहशत आदी घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फुलेनगर परिसरात भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सातपूर परिसरात दिवसाढवळ्या पूर्ववैमन्यसातून गोळीबार करण्यात आला. यातील  संशयित अद्यापही फरार आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कंपनी व्यवस्थापकाच्या खून करण्यात आला. यातील संशयित अद्यापही फरार आहेत. तर काल दहावीच्या पेपर सुटल्यानंतर काही संशयितांनी अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला करत पळ काढला. या सर्व घटना या भरवस्तीत होत असल्याने पोलिसांना कुणाचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज भुजबळांनी देखील पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790