नाशिक (प्रतिनिधी): बजाज फायनान्स कंपनीच्या थत्तेनगर शाखेच्या अधिकाऱ्याने दोन व्यक्तींना डॉक्टर असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून देऊन व ४० लाखांचे वैद्यकीय कर्ज मंजूर करून दिल्याने अधिकारी व दोन खोट्या डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव किरण रामदास कांबळे असून श्रीराम नेरपगार व योगेश केदारे हे बोगस डॉक्टरांची नावे आहेत. पोलीस व बजाज फायनान्सचे अधिकारी सुमित कांबळे यांच्या माहिती नुसार, संशयित अधिकारी व बोगस डॉक्टर यांनी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार करून वैद्यकीय कर्ज मंजूर करून घेतले. नेरपागारच्या नावे १९ लाख ४९ हजार तर केदारेच्या नावे २० लाख ४२ हजारांचे कर्ज मंजूर करत, चेक युनियन बँक व महाराष्ट्र बँक शाखेत वटवून घेतला व अपहार केला. कंपनीचे अकाउंट चेक करत असताना हा प्रकार लक्षात आल्यावर या तिघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.