अंदाज:आज मान्सून केरळला धडकणार; राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता

अंदाज:आज मान्सून केरळला धडकणार; मध्य राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता

नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तो 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर तत्पूर्वी 2021 मध्ये तो 1 जूनला पोहोचला होता.

मान्सूनची स्थिती 4 जून रोजी दुपारी 4 वा. source-imd

IMD ने सोमवारपासून केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD च्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून सध्या लक्षद्वीप व दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागातून पुढे सरकत आहे.

लाल रेषा मान्सूनच्या अंदाजाच्या तारखा दर्शवतात. निळ्या रेषा मान्सूनची सद्यस्थिती दर्शवतात.

रविवारी एका अलर्टमध्ये आयएमडीने म्हटले आहे- राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान व निकोबार बेट समूह, केरळ, कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, किनारपट्टी आंध्र प्रदेश व यानाम, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट, मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत केरळच्या पठानमथिट्टा व इडुक्की जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

यंदा सरासरी पावसाचा अंदाज:
यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस सामान्य झाल्यास देशातील अन्नधान्य उत्पादनही सामान्य होईल. म्हणजेच महागाईपासून दिलासा मिळू शकतो. देशातील शेतकरी साधारणत: 1 जूनपासून खरीप पिकांची पेरणी सुरू करतात. याच वेळी मान्सून भारतात प्रवेश करतो. पिकाची पेरणी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सुरू असते.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

सरासरी पाऊसमान म्हणजे काय?:
IMD ने सांगितले की, दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 96% पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस LPA च्या 90-95% दरम्यान असेल तर तो सामान्यपेक्षा कमी आहे असे मानले जाते. पण तो LPA 96%-104% असेल तर त्याला सामान्य किंवा सरासरी पाऊस म्हटले जाते.

दुसरीकडे, पाऊस LPA 104% व 110% च्या दरम्यान झाला तर त्याला सामान्याहून जास्त पाऊस असे म्हणतात. तर110% पेक्षा जास्त पावसाला अतिवृष्टी म्हणतात. 90% पेक्षा कमी झालेल्या पावसाला दुष्काळ म्हटले जाते.

80 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून:
देशात वर्षभर जेवढा पाऊस पडतो, त्यापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. आजही आपल्या देशातील 70% ते 80% शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या परिस्थितीत त्यांचे उत्पादन पूर्णतः कमी किंवा जास्त पावसावर अवलंबून असते. खराब पावसाळा आला की महागाईही वाढते.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 20% आहे. त्याच वेळी, कृषी क्षेत्र देशाच्या निम्म्या लोकसंख्येला रोजगार प्रदान करते. चांगला पाऊस म्हणजे निम्म्या लोकसंख्येचे उत्पन्न सणासुदीपूर्वी चांगले होऊ शकते. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमताही वाढते.

देशात मान्सून येण्याचा नियम काय?:
केरळ, लक्षद्वीप व कर्नाटकमध्ये मान्सून आल्याची घोषणा करणाऱ्या 8 स्थानकांवर सलग 2 दिवस किमान 2.5 मिमी पाऊस झाला की, देशात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली जाते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790