हृदयद्रावक: केळवे समुद्र किनाऱ्यावर नाशिकच्या तीन मुलांसह एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): पालघरच्या केळवे बीच समुद्रात सहा जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या दुर्दैवी घटनेत चौघांचा बुडून मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे.
तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकच्या तरुणांचा मोठा ग्रुप पिकनिकसाठी आला होता.
- नाशिक: इंजिनिअरिंगच्या बेपत्ता विद्यार्थ्याचा पाटाच्या पाण्यात आढळला मृतदेह
- नाशिक: दहावीच्या विद्यार्थ्याला प्राचार्यांकडून काठीने मारहाण; उपनगर पोलिसांत तक्रार
त्यातील हे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुले बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी नाशिकचे हे चार तरुण पाण्यात गेले. मात्र हे चौघेही पाण्यात बुडाले. वाचवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच स्थानिकांनी या मुलांचा शोध घेतला असता चारही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. तर बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे: दीपक वडाकाते (नाशिक), कृष्णा शेलार (नाशिक), ओम विसपुते (नाशिक), अथर्व नागरे (केळवे).