सिव्हील हॉस्पिटल बालिका अपहरण: अद्यापही संशयितांचा शोध नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातून दोन दिवसापूर्वी एक वर्षीय बलिकेचे अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैदसुद्धा झाला होता. मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. शनिवारी दिनांक १३ रोजी दुपारी १ वाजता संगीता गौड या महिलेच्या एक वर्षीय मुलीचे सिव्हिल हॉस्पिटलमधून मुलगी झोपलेली असताना अपहरण करण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिकला तीन दिवस येलो अलर्ट; गडगडाटी पावसाची शक्यता…

सरकारवाडा पोलिस ठाण्याचे तीन आणि गुन्हे शाखा युनिट १ व २ चे चार पथकांकडून याबाबत शोध घेतला जात आहे.पथकांकडून बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाणे आणि शहरातील सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी केली जात आहे. मात्र, संशयिताची अद्याप ठोस माहिती मिळाली नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790