सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल

नाशिक (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच सुरू करुन, डिसेंबर महिन्यापर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी पासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असून, या केंद्रात उद्योग आधारित नाविन्यपूर्ण आभ्याक्रमांवर विशेष भर देण्यात येणास असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे केले.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ येथील ‘यश ईन’ सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी मंत्री श्री. उदय सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई.वायूनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

सामंत पुढे म्हणाले की, नाशिक हा उदयोग क्षेत्राच्या दृष्टीने संपन्न असा जिल्हा आहे. या ठिकाणी विविध उद्योगांना चालना देणारे व्यवसाय सुरु करता येतील. म्हणून या दृष्टीने भविष्याचा विचार करता उपकेंद्रात खद्यापदार्थं अणि दागीने घडणावळीच्या संबंधित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. विद्यापीठं उपकेंद्र सुरू करण्यासाठी उपलब्ध केलेल्या जागेवर विद्यापीठाला शोभेल अशी सर्वसोईयुक्त सुसज्ज इमारत बांधण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790