सातपूर परिसरात घडताय एकामागे एक अपघात; ५ दिवसांत ३ मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात अपघाताच्या घटना या वाढतच चालल्या आहेत. तर सातपूर परिसरात आधीच काही दिवसांपूर्वी २ अपघात झालेले असतांना, एका अज्ञात पिकअप व्हॅनने धडक मारल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. म्हणून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी (दि.२१ डिसेंबर) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अजय विजय मनोहर (वय २३, रा.तळेगाव इगतपुरी) हा युवक दुचाकीने (एमएच १५ एचडी) जात होता. दरम्यान, सातपूर परिसरातील समृद्धीनगर येथे साई कलेक्शनच्या समोर अज्ञात पिकअप व्हॅन चालकाने अजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. अजयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरु असतांनाच अजयचा मृत्यू झाला. तर ४ दिवसांपूर्वीच सातपूर परिसरात जॉगिंगसाठी घरातून निघालेल्या रोशनी जयस्वाल हिचा घंटागाडीखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. तसेच त्याच दिवशी निखिल अमित पाटील (वय १६, रा.महादेवनगर) हा सायकलने सातपूर परिसरातून जात होता. दरम्यान, एका अज्ञात ओम्नी व्हॅन चालकाने धडक दिल्याने निखिल गंभीर जखमी झाला. निखिलवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक कारवाईत २५ हजार रुपयांचा दंड वसूल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790