संख्या वाढली: नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह

नाशिक (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी-जास्त प्रमाणात वाढ होताना दिसतेय.
शनिवारी (दि. १८ जून) नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालेली दिसतेय.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ जून) एकूण ३६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: २७ आणि नाशिक ग्रामीण: ०९ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८८९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत एकूण १३९ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर शनिवारी एकूण १५ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककर खबरदार… विनापरवानगी वृक्ष तोडाल तर, भरावा लागणार एक लाखापर्यंतचा दंड
नाशिक: वीज कट करण्याचा एसएमएस पाठवून ९० हजार रुपयांचा गंडा
तब्बल १४ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश