“शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत आपण काळजी घेणे आवश्यक”

नाशिक (प्रतिनिधी) : सगळ्याच जगावर गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. सध्या तरी रुग्णसंख्येचा दर घटत असल्याने एक सकारात्मकता आलेली आहे. तरीही शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत आपण काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, कोरोनामुळे राज्याचा अधिकाधिक खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च होत आहे; कारण ‘जान है तो जहाँ है’. जर माणूस असेल तरच सर्व काही आहे. विकासकामे होत जातील आणि शासनस्तरावर आपण प्रयत्न करून मतदारसंघात अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी निधी आणू आणि ते विकासकामे मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजात काही ठिकाणी अटकाव करण्यात आला होता; मात्र, अर्थव्यवस्था सुरू रहावी यासाठी शासन हळूहळू सर्व पूर्वपदावर आणत असून लवकरच सर्व व्यवहार पूर्व पदावर येत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790