शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांना गती देणार – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून राधाकृष्ण गमे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त गमे म्हणाले,  विभागाचा आढावा घेत असतांना प्रधान्याने विभागातील कोरोनाची स्थिती जाणून घेवून ज्या ठिकाणी पायाभुत सुविधा कमी असतील त्या ठिकाणी रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या मुख्य योजनांपैकी शेतकरी पीक कर्ज वाटप व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत, विभागीय आयुक्त गमे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

शासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेणार

विभागातील शासकीय कामांना व शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांना गती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना भेटी देवून त्यांचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करावीत

नवनिर्वाचित विभागीय आयुक्त यांनी उपायुक्त व सर्व विभाग प्रमुखांना तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करण्याबाबत सूचित केले. तसेच प्रत्येक कामाचे नियोजन करतांना तीन टप्प्यात करुन त्यामध्ये  दैनंदिन आवश्यक कामे त्याच दिवशी  निकाली काढावीत, आठवड्याची कामे आठवड्यात तर  महिन्याभराचा कालावधी असलेली कामे महिन्याभरात निकाली काढावीत. तसेच प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाच्या कामाच्या माहितीची टिपणी व मागील झालेल्या बैठकांचे इतिवृत्त सादर करण्याच्या सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790