नाशिक (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विखरणी विद्युत उपकेंद्र ते आंबेगांव स्वतंत्र 11 केव्हीए वाहीनी उभारणीसह स्पेशल डिझाईन ट्रान्सरफार्मरमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते येवला तालुक्यातील आंबेगांव येथे अद्यावत ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि मुलभूत सुविधा अंतर्गत मारुती मंदिरासमोर १० लक्ष रुपये किंमतीचे पेव्हरब्लॉक बसविणे कामाचे भुमीपूजन कार्यक्रमात बोलत होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना सर्वाधिक आवश्यकता वीजेची असते. वीज मिळाली तर शेतकरी शेतीतून पीक मोठया प्रमाणावर उत्पादन करू शकतो. साधारण पणे ६५० ग्राहकांना या अद्ययावत विजेच्या वाहिनीचा फायदा होणार आहे. कांद्याच्या दराबाबत केंद्र सरकारने एफआरपीने कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.