नाशिक (प्रतिनिधी) : वाढीव घरपट्टी आणि मालमत्ता कर लागू करून शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते. मात्र कराच्या मोठया वाढीमुळे याचा फटका शहरातील अर्थव्यवस्थेला लागू शकतो. एकत्रितपणे येऊन नगरविकासमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू आणि वाढीव कर कमी करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही नरेडकोच्या शिष्टमंडळाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त कैलास जाधव, नरेडकोचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यात वाढीव घरपट्टी आणि मालमत्ताकर प्रक्रियेचा बेकायदेशीरपणा पालकमंत्री भूजबळ यांच्या लक्षात आणून दिला. महानगरपालिका आयुक्त जाधव यांना नगररचना विभागाकडे पाठवलेले ठराव मंजुरीशिवाय परत घेण्यास सांगितला. शहरातील सर्व विभागाशी विचारपूस करून त्यांच्या सल्याने करांचे नवीन दर ठरून निश्चित केले जाऊ शकता. असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेला मिळणार महसूल आणि शहराची प्रगती होईल अशी अशा भूजबळ यांनी व्यक्त केली.