नाशिक: लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी हे तीन दिवस मोफत नेत्र तपासणी !
नाशिक (प्रतिनिधी): लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी नेहमीच नाशिककरांसाठी वेगवेगळे लाभदायक असे उपक्रम राबवत असते.
हीच परंपरा कायम राखत नाशिककरांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची नेत्र तपासणी लोकमान्यच्या चारही शाखांमध्ये केली जाणार आहे.
यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून डोळे तपासले जाणार आहे. सोबतच योग्य असा सल्ला दिला जाणार आहे. ही तपासणी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यत केली जाणार आहे. सर्व नाशिककरांसाठी ही तपासणी खुली असून गरजूंनी अवश्य याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्यकडून करण्यात आले आहे.
या ठिकाणी होणार नेत्र तपासणी:
नेत्र तपासणी केंद्रे खालीलप्रमाणे दि. 26 ऑक्टो. (सिडको शाखा) दुकान क्रमांक 1, राजाश्री एम्पायर, अंबड सिडको लिंक रोड, कामटवाडे शिवार.दि. 27 ऑक्टो.(नाशिकरोड शाखा) दुकान क्रमांक 07, टाइप-ए, ऑरेंज ट्री हॉटेल जवळ हरिनीवास अपार्टमेंट, मुक्तिधाम मंदिराच्या मागे, नाशिकरोड, दि. 28 ऑक्टो.(इंदिरानगर शाखा) दुकान क्रमांक 2, तळमजला, जे.पी. अव्हेन्यू अपार्टमेंट रथचक्र चौक, वडाळा – पाथर्डी रोड, इंदिरानगर, दि. 29 ऑक्टो.(सावरकरनगर शाखा) शॉप नं.3 सिम्फनी अपार्टमेंट माटे नर्सरी रोड, ऑफ, गंगापूर रोड, सावरकरनगर, नाशिक.