लष्कर कंत्राटात कोट्यवधींचा अपहार,‎ नाशिकचे रत्नाकर पवार यांना अटक‎

जम्मू-काश्मीर‎ पोलिसांची कारवाई‎

नाशिक (प्रतिनिधी): लष्कराच्या कंत्राटात कोट्यवधींचा‎ अपहार केल्याप्रकरणी नाशिकचे‎ बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार‎ यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाच‎ दिवसांपूर्वी अटक केली.

गंगापूर‎ पोलिस ठाण्यात याबाबत नोंद‎ करण्यात आली असून सुमारे ५०‎ कोटींचा अपहार केल्याची माहिती‎ सूत्रांनी दिली.‎ पोलिसांनी दिलेली माहिती अशी,‎ कंत्राटदार पवार हे महानगरपालिका,‎ जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय‎ विभागांत विविध कामांचे कंत्राट‎ घेतात. त्यांनी ५ वर्षांपूर्वी जम्मू-‎ काश्मीरमध्येही लष्कराचे मोठे कंत्राट‎ मिळवले होते.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

लष्कराला विविध‎ वस्तू पुरवठा करण्याच्या कामात पवार‎ यांनी सुमारे ५० कोटींचा अपहार‎ केल्याचे लष्करी प्रशासनाच्या‎ निदर्शनास आले. संबंधित‎ अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार‎ जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आर्थिक‎ गुन्हे विभागात पवार यांच्याविरोधात‎ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात‎ आला होता.

जम्मू-काश्मीरचे पोलिस‎ त्यांच्या मागावर होते. ते गंगापूर‎ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास‎ असल्याची माहिती पोलिसांना‎ मिळाली. काश्मीर पोलिसांनी गंगापूर‎ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक‎ रियाज शेख यांच्याशी संपर्क साधून‎ पवार यांना चौकशीसाठी बोलावून‎ त्यांना ताब्यात घेतल्याची पोलिस‎ ठाण्यात नोंद केली. त्यानंतर जम्मू-‎ काश्मीर पोलिस रवाना झाले.‎

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790