लग्नाहून परततांना झाडाखाली थांबले, वीज कोसळून आई वडिल ठार; दोन्ही मुली जखमी

लग्नाहून परततांना झाडाखाली थांबले, वीज कोसळून आई वडिल ठार; दोन्ही मुली जखमी

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील शेतकरी दांपत्य पिंपळगाव घाडगा येथे लग्नासाठी गेले होते.

लग्न लागल्यानंतर परतीच्या प्रवासात अचानक जोरदार वादळी वारे व वीजांचा कडकडाट सुरू झाला.

झाडाखाली थांबलेल्या शेतकरी दांपत्यावर अचानक वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.६) रोजी दुपारी वाजता घडली.

या दांपत्याबरोबर असलेल्या त्यांच्या दोन मुलींसह एक महिला व एक पुरुष असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:  २ महिन्यांच्या मुलीची ५ लाखांत विक्री; नाशिकमधील आईसह ९ जणांना अटक !

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात आज सकाळपासून पावसाचे सावट दिसून येत होते. इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील १) दशरथ दामू लोते (३५, मालुंजेवाडी ता. इगतपुरी) २) सुनिता दशरथ लोते (३०, मालुंजेवाडी ता.इगतपुरी) हे आदीवासी शेतकरी दांपत्य इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यावर घरच्या प्रवासासाठी निघाल्यानंतर वाटेतच काही कालावधीनंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने जोरदार वारे वाहू लागले. विजांचाही कडकडाट सुरू झाल्यामुळे सदर दांपत्य व दोन मुली घाबरून गेले. यावेळी दांपत्याने रस्त्यावरील एका झाडाचा आसरा घेतला. परंतू या दांपत्यांचे दुर्दैव, अचानक वीज पडल्यामुळे ते जागीच ठार झाले.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

सोबत असलेले मुलं १) तेजस्वी दशरथ लोते ( ७, मालुंजेवाडी, ता.इगतपुरी) २) सोनाली दशरथ लोते (५, मालुंजेवाडी ता.इगतपुरी) यांच्यासह अन्य एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून सदर जखमींना एसएमबीटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह पुढील उत्तर तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी वीज पडून ठार झालेल्या दांपत्यांच्या व कुटुंबीयांन भरपाई देण्यात यावी तसेच जखमींना देखील शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group