विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि ज्येष्ठ विधीज्ञ मंदार भानोसे यांची प्रमुख उपस्थिती…
नाशिक : ‘जनस्थान’ हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात रविवार पासून (दि. १८) ते २१ तारखेपर्यंत असे चार दिवस ‘नवरंगात रंगली सृष्टी’ या चित्र – शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दि १८ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि ज्येष्ठ विधीज्ञ मंदार भानोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जनस्थानचे सदस्य व नुकतेच ज्यांचे निधन झाले ते ज्येष्ठ चित्रकार कै. अनिल माळी यांचे नाव कलादालनाला दिले जाणार आहे.
‘जनस्थान’मधील सर्व सन्माननीय चित्रकारांनी केलेली चित्रनिर्मिती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. यावर्षीचे वेगळेपण म्हणजे जनस्थान परिवाराच्या बाहेरील कलावंतांनाही सन्माननीय आमंत्रित म्हणून बोलविण्यात आले आहे. यंदा विविध दैनिकांमधील छायाचित्रकारांची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे एका स्वतंत्र दालनात मांडण्यात येणार असून नाशिककरांना त्याचाही आस्वाद घेता येईल. यावेळी शिल्पकार दोन दिवस प्रत्यक्ष शिल्पनिर्मिती करून दाखवणार आहेत.
या प्रदर्शनात जनस्थानीय चित्रकार:
चारूदत्त कुलकर्णी, धनंजय गोवर्धने, आनंद ढाकीफळे, राजा पाटेकर केशव कासार, नंदन दीक्षित, प्रसाद पवार, अतुल भालेराव, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, निलेश गायधनी, पुजा गायधनी, स्नेहल एकबोटे, पूजा बेलोकर यांच्याबरोबर बबन जाधव, अनिकेत महाले, शेफाली भुजबळ, भुवनेश्वरी भुजबळ, तृप्ती चावरे – तिजारे हे आमंत्रित चित्रकार असतील.
शिल्पकारांमध्ये संदीप लोंढे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, वरूण भोईर( आमंत्रित शिल्पकार)
‘मिसळ क्लब’च्या सदस्यांमध्ये मनोज जोशी, सचिन पाटील, नितीन बिल्दीकर, किरण पाटील, सुनिल महामुनी.
दैनिकातील छायाचित्रकरांमध्ये प्रशांत खरोटे, ( लोकमत ), सतिश काळे, पंकज चांडोले (महाराष्ट्र टाइम्स ), अशोक गवळी ( दिव्य मराठी ), केशव मते ( सकाळ ), यतीश भानू ( लोकसत्ता ), विजय चव्हाण, हेमंत घोरपडे ( पुढारी ), निलेश तांबे (लोकमत), विवेक बोकील(दिव्य मराठी), गणेश खिरकाडे(पुण्य नगरी), सतीश देवघरे (देशदूत) यांचा सहभाग असणार आहे. प्रदर्शनास कुसुमाग्रज प्रतिष्ठानने विशेष सहकार्य केले आहे.
नाशिक (नासक) हिरा बघायची संधी
जनस्थानच्या ९ व्या वर्धापनदिन निमित्ताने
उत्कंठा व प्रेमाचा प्रतीक असलेला जगप्रसिद्ध नाशिक (नासक) हिरा .या हिऱ्यास त्रंबकेश्वर येथे मिळून आल्याने यास आय ऑफ शिवा या नावाने देखील जगात प्रसिद्धी मिळालेली आहे असा हा आपल्या नाशिकचा हिरा जगात सर्वात दुर्मिळ व मौल्यवान हिऱ्याच्या सूची मध्ये पहिल्या १० हिऱ्यामध्ये याची गणना केली जाते असा आपल्या नाशिकचा वारसा असलेला नाशिक हिऱ्याची प्रतिकृती या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी त्याच वजन व साईज मध्ये तसेच मूळ नाशिक हिऱ्याप्रमाणेच पैलू पाडलेला व क्यूबिक झिरकॉन या रत्ना मध्ये बनवलेला नाशिक हिऱ्याची प्रतिकृती सर्व नाशिककरांनी आवश्य बघायला हवी
या संपूर्ण फेस्टीवलसाठी एकदंत फिल्म्स ,गोविंद जयकृष्णे दंडे,अशोका बिल्डकाँन,हॉटेल पतंग,हॉटेल सात्विक,हॉटेल पंचवटी ग्रुप यात्री,भूषण कोठावदे,शंतनू देशपांडे,श्रीराम गोरे,श्रीपद्मवती केटर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे
या अनोख्या प्रदर्शनाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.