नाशिक (प्रतिनिधी): मागील महासभेत कोरोना वरून जोरदार झाली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांच्या उपचार संदर्भात विविध गोष्टीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर खापर फोडले होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता या सह अनेक गोष्टीवर चर्चा रंगली होती. त्यानुसार वैद्यकीय सेवे संदर्भात वेगळी बैठक घेण्यात आली. त्यात संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारणार असल्याचे सांगण्यात आले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या त्या परिसरात रुग्णच्या उपचाराची व्यवस्था व्हावी या करता महापालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यातूनच सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या बैयठकींत वैदकीय विभागाने या नियोजनाची माहिती दिली. त्यानुसार विभागनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नयोजन करण्याच्या सूचना दिल्या.