‘या’ कारणामुळे महिलेचा थेट नाशिक पोलीस आयुक्तालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

‘या’ कारणामुळे महिलेचा थेट नाशिक पोलीस आयुक्तालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून युवा स्वाभिमानच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी नाशिकमध्ये घडली.

मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री शहराच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिल्ले यांच्या म्हणण्याप्रमाणे, शिवसेना नेते सुनील बागूल यांचे बंधू श्रमिक सेनेचे पदाधिकारी अजय बागूल यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अंबड आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती.

हे ही वाचा:  दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मात्र, त्या ठिकाणी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप महिलेने केला. पोलीस आयुक्तालयासमोर दुपारच्या सुमारास आलेल्या या महिलेने अचानक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतला. यावेळी महिलेचा पतीदेखील सोबत होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा महिलेचा आरोप आहे. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आता पोलीस तपासानंतरच पुढे येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790