मोबाईलवर पबजी गेम खेळत असताना युवकांना मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): घराजवळ मोबाईलवर पबजी गेम खेळत असताना दोन युवकांना चौघा जणांनी मारहाण केल्याची घटना आडगाव शिवारात घडली. याप्रकरणी चौघा जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 27 जून रोजी सायंकाळी सहा वाजता धात्रक फाटा सेक्शन निशांत गार्ड न आग्रारोड आडगाव नाशिक येथे यातील राहुल सुनिल खंडारे ( वय 18, रा. धात्रक फाटा निशांत गार्डन समोर पुरोषात्तम सोसा बिल्डींग नं. ३, प्लॅट नं 29 आडगाव शिवार नशिक) व त्याचे मित्र सचिन शाम सिरसाठ (वय 21) हे सोबत पबजी गेम खेळत होते.

हे ही वाचा:  नाशिक: दुचाकीच्या चेनमध्ये साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार

याचवेळी नयन शेजवळ (वय 20, रा. त्रिकोणी बंगल्याजवळ नाशिक), मनिष शेजवळ (वय 19 रा. त्रिकोणी बंगल्याजवळ, नाशिक), निखिल शेजवळ (वय 16 रा. कृष्णा स्विट समोर आप्पा किराणा दुकानाच्या वर धात्रक फाटा नाशिक), कैलास शेजवळ (वय 37 रा. कृष्णा स्विट समोर आप्पा किराणा दुकाणाच्या वर धात्रक फाटा नाशिक) हे चौघे जण तेथे आले व विनाकारण राहुल व त्याचे मित्र सचिन यांना मारहाण केली तसेच रॉड व चाकूने जखमी केले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुरनं 0190/2020 भा.दं.वि.क. 324 , 34,, मुंबई पोलीस अधि, 1951 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790