मुंबईत गोवरचे थैमान, 7 संशयित मृत्यू; तर मालेगावमध्ये ५० पेक्षा जास्त बालकांना गोवरची लागण

मुंबईत गोवरचे थैमान, 7 संशयित मृत्यू; तर मालेगावमध्ये ५० पेक्षा जास्त बालकांना गोवरची लागण

नाशिक (प्रतिनिधी): मुंबईत जानेवारीपासून 142 गोवरचे रुग्ण आढळले, तर सद्यस्थितीत 61 गोवरचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली. मुंबईत 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात गोवरचे संशियत मृत्यू झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही गोमारे यांनी केला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुंबईतील 20 हजार लहान मुले (0 ते 2 वर्ष) असे समोर आलेत ज्यांना गोवरच्या पहिली किंवा दुसरी लस मिळाली नाहीत. त्यांचे लसीकरण करणे गरजेचे असून त्यांचे लसीकरण आधी प्राधान्याने करत आहोत. विविध विभागात सर्वेक्षण सुरू असून  ताप, पुरळ आदी लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

तर आता मालेगावमध्ये पन्नासपेक्षा जास्त बालकांना गोवरची लागण झाल्याचे समोर आले आहे..

मालेगाव महापालिकेसह विविध रुग्णालयांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. मालेगाव मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी गोवरचे रुग्ण असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यातील बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मालेगाव शहरात गोवरचे रुग्ण आढळून आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे रुग्ण दिसून येताच मालेगाव महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात पाहणी व तपासणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

तपासणीदरम्यान गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालेगाव शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. आरोग्य विभागाने आवश्‍यक ती पावले उचलली असून, रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि, पालक व रुग्णांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी बालकांना विविध प्रकारच्या साथरोगांचे लसीकरण करून घेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790