महिलेला सासरच्यांकडून २ लाख रुपयांची मागणी; पैसे न दिल्याने छळ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातल्या त्यात घरगुती हिंसा तर अधिकच. मानपान, हुंडा, मुलींचे स्वतंत्र विचार या सगळ्या मुद्द्यांवरून छळ करण्याच्या घटना घडतात. आडगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार नोंदवली आहे.

घरातील व्यक्तींनी संगनमत करून नवीन घर घेण्यासाठी रुपाली यांना आपल्या माहेरून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. यासाठी दरवेळी वाईट बोलून शिवीगाळ करून मारहाण केली जायची. व महिलेला उपाशी पोटी ठेऊन माहेरून पैसे न आणल्यास नांदवनार नाही असे सांगून वारंवार सासरच्यांकडून दमदाटी करून मारहाण केली जायची. म्हणून तिने नवरा, सासरे, सासू व अजून दोन जणांची तक्रार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वृद्धाला पावणेचार कोटींचा गंडा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790