नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पेठरोड परिसरात असलेले हॉटेल महाराष्ट्र दरबार बंद असतांना त्यातील ४६ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली. चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार हॉटेलचे व्यवस्थापक अश्रफ नजीर मणियार (वय ३०) यांनी केलेल्या तक्रारीत ही चोरी २३ मार्च २०२० ते २७ ऑगस्ट २०२० दरम्यान झाली. हॉटेलच्या मागच्या बाजूचा पत्रा काढून हॉटेलमधून प्रवेश केला गेला. ७ पितळी धातूचे पातेले, एक कॉम्युटर सेट, एक प्रिंटर, इन्व्हर्टर, ४ बॅटऱ्या, २ सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ४६ हजार किंमतीचे साहित्य चोरीस गेले. पोलिसांनी संशयित आरोपी राहुल संजय तुरे (वय १८) व अजून २ अल्पवयीन शिवा व राजू उफाडे नामक बालकांना ताब्यात घेतले आहे. राहुल तुरे हा त्याच महाराष्ट्र दरबार हॉटेलमध्ये कामास होता. राहुल त्याच्या गावी विरगाव जिल्हा अहमदनगर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला. तपासाअंतर्गत कळले राहुलने शिवा व राजू उफाडे यांच्या मदतीने ही चोरी केली.