नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे होळकर चौकात महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, या शौचालयाचे रूपांतरण भंगाराच्या गोदामात झाल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
प्रभाग क्रमांक-०९ चे नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजीनगर, ध्रुवनागर परिसराचे प्रभाग सभापती रवींद्र धिवरे तसेच महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी परिसरात समस्यांचा पाहणी दौरा करत होते. दरम्यान त्यानां होळकर चौकातील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयास कुलूप लावलेले आढळले. कुलूप तोडले असता, शौचालयात मोठ्या प्रमाणावर साठवलेले भंगार मिळाले. पत्र्याची शेड उभारून शौचालयाला भंगारचे गोदाम करण्यात आलेले अतिक्रमण तोडण्यात आले. याबाबत अधिक तपास करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.