महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही..

Ad: Ustraa After Dark Colonge Perfume (100 ml) At Just Rs. 477. Buy Now !

महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.

या सब स्टेशनमधील दुरुस्ती कामे करणेकरीता शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पॉवर सप्लाय बंद ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: कणगा आर्ट फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या चित्रांचे प्रदर्शन

तसेच मनपाच्या गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथील दुरुस्ती कामे करणे आवश्यक असल्याने शनिवार दि. २० रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पावेतो मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र येथून संपुर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

सबब या दोन्हीही ठिकाणांहून होणारा पूर्ण शहराचा पाणीपुरवठा दि. २० रोजी बंद ठेऊन उपरोक्त नमूद कामे करता येणे शक्य होणार आहे.

तरी मनपाचे गंगापूर धरण व मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि . २० ऑगस्ट रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार दि . २१ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group