महत्वाची बातमी: पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या “या” तारखेदरम्यान रद्द

महत्वाची बातमी: पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या “या” तारखेदरम्यान रद्द

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आल्य्मुळे चाकरमान्यांना रस्त्याने व बसने प्रवास करावा लागणार आहे.

२५ ते २९ जून दरम्यान पंचवटी रद्द करण्यात आलेली असून रेल्वेने त्यासंदर्भातील वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

बुधवारी मुंबईला जाताना पंचवटी सुरु आहे. मात्र, यादिवशी मुंबईहून नाशिकला येताना ती रद्द आहे.

मनमाड नजीक अंकाई किल्ला ते मनमाड सेक्शनमध्ये अप आणि डाऊन स्वतंत्र डबल लाइन रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी तसेच यार्ड रिमॉडलिंग कामासाठी सुमारे ८ दिवस मुंबई-नागपूर, मुंबई-नांदेड दरम्यानच्या अनेक प्रमुख गाड्या विविध टप्प्यांत २९ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील अशी चिन्हे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10982,10980,10974″]

पंचवटी २५ ते २९ जून, राज्यराणी २६ ते २८ जून तसेच जनशताब्दी, सेवाग्राम, नंदीग्राम, देवगिरीसह अनेक प्रमुख प्रवासी गाड्या या दरम्यान विविध कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द गाड्यांचा कालावधी असा:
मुंबई- मनमाड पंचवटी एक्स्प्रेस २५ ते २९ जून, नांदेड- मुंबई राज्यराणी २६ ते २८ जून, मुंबई- जालना जनशताब्दी २५ ते २९ जून, मुंबई-नागपूर सेवाग्राम २५ व २६ जून, मुंबई – अदिलाबाद नंदिग्राम २६ ते २८ जून, मुंबई- सिकंदराबाद देवगिरी २६ ते २८ जून, मनमाड- सिकंदराबाद अजिंठा २४ ते २८ जून, पुणे- निजामाबाद डेमू २४ ते २८ जून, नांदेड- मनमाड डेमू एक्स्प्रेस १९ ते २८ जून. साईनगर-शिर्डी काकिनाडा २५ ते २८ जून, सिकंदराबाद- शिर्डी एक्स्प्रेस २४ ते २७ जून, पुणे- निजामाबाद डेमू २३ व २४ जून, दादर- शिर्डी साईनगर २७ व २८ जून, नांदेड- हडपसर २६ व २७ जून, मनमाड- धर्माबाद मराठवाडा २७ व २८ जून, पुणे- प्रयागराज बनारस २७ व २९ जून, दादर-काजीपेठ २५ व २६ जून, नागपूर- पुणे २७ व २८ जून, पुणे- नागपूर गरीब रथ २६ व २७ जून, जसिदी- पुणे २४ व २६ जून, काजीपेठ- पुणे २४ व २७ जून.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group