महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ११ फेब्रुवारी) ‘या’ भागात पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ११ फेब्रुवारी) ‘या’ भागात पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

नाशिक शहरात शुक्रवारी काही भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व वाहिनीवरील 900 मि.मि. व्हॉल दुरुस्ती कामासाठी शुक्रवार दिनांक 11/02/2022 रोजी शटडाऊन आवश्यक आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पाणीपट्टी दरवाढीला अखेर स्थगिती; अतिरिक्त आयुक्तांनी केली घोषणा !

त्यामुळे मनपाचे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन पाणी पुरवठा होणा-या नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. 23 भागश: व 30 भागश: साईनाथ नगर, विनय नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीप नगर,  मिल्लत नगर,  जे एम सी टी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमा नगर, गणेश बाबा नगर, आदित्य नगर,  कल्पतरू नगर,  पखाल रोड, मातोश्री कॉलनी,  ममतानगर,  अशोका मार्ग, इ. परीसर व  संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 17,18,19,20, 21 व 22 मधील पाणीपुरवठा शुक्रवार दि. 11/02/2022 रोजीचा सकाळी 09:00 वाजेनंतर व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच शनीवार दि. 12/02/2022 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  Breaking: नाशिक हादरलं…नाशिकमध्ये पुन्हा खून; २ जण पोलिसांच्या ताब्यात

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790