
भद्रकाली परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक (प्रतिनिधी): भद्रकाली परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने कोळीवाडा येथे ही कारवाई केली.
संशयितांकडून चार घरफोडीच्या गुन्ह्यातील एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हानी फुलचंद बरेलीकर (रा. शिवाजी चौक), किशोर बाबूराव वाकोडे (रा. कोळीवाडा, भद्रकाली) असे या संशयितांचे नावे आहे. या दोघांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिक येथील जनसिंग ससाणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ९५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते. अर्जुल राठोड यांचे मोबाइलचे दुकान फोडून ७० हजारांचे मोबाइल चोरी करण्यात आले होते. तसेच एका अल्पवयीन मुलाकडे ७५ हजारांचा चांदीचा मुकूट, छत्री, कमरपट्टा मिळून आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. संशयितांकडून एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.