भगूरला वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या भगूर-राहुरी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने येथील ग्रामस्थांनी एकच सुटकेचा निश्वास टाकला आहे..
नाशिकरोड, भगूर गाव, देवळाली कॅम्प आणि येथील लागून असलेल्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीच वातावरण पसरले होते. त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात होते.
यातच आता भगूर गावाजवळ असलेल्या राहुरी येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या जेरबंद केला आहे. या परिसरात बिबट्याने एक वासरू अनेक शेळ्यांची देखील शिकार केली होती. तर या परिसरात बिबट्याच्या वावर मुळे नागरिकांनी बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सातत्याने येथील ग्रामस्थांनी केली होती.त्यानुसार वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या गुरुवारी सकाळी जेरबंद झाला आहे.