बॅनर्स आणि होर्डींग्ज लावण्यासाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक
नाशिक (प्रतिनिधी): शहरात अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे. फलक लावणाऱ्यांना पोलिसांची परवानगी आवश्यक राहणार असून पोलिसांकडून फलकांना दिला जाणारा नंबर फलकावर टाकणे अनिवार्य राहणार आहे. शहरात होर्डिंग, पोस्टर, फ्लेक्स, बॅनरमुळे वि’द्रु’पी’करण होत आहे. हे विद्रुपीकरण रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून नियोजन सुरु असून लवकरच या कारवाईची अधिसूचना काढली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली.
शहरात राजकीय पक्ष, व्यावसायिकांद्वारे जाहिरात केली जात आहे. रस्त्यावर आणि चौकाचौकांत बेकायदा फलक आणि पोस्टर लावले जात आहे. यामुळे शहराच्या वि’द्रु’पी’क’रणात भर पडत आहे. यासह भाई, दादा, प्रेरणास्थान, आधारस्तंंभ यांच्या वाढदिवसाचे फलकदेखील विनापरवानगी लावले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आता फलक लावण्यावर पोलिसांकडून निर्बंध लावले जाणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8090,8076,8079″]
फलकासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. पोलिसांकडून परवानगी दिलेल्या फलकांना नंबर दिला जाणार आहे. विनापरवानगी फलक लावलेल्या फलकवरील फोटोतील सर्व इसमांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. आगामी येणारे नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी, नुतन वर्ष आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचा एक भाग म्हणून अवैध फलकबाजीवर पोलिसांनी व’क्र’दृ’ष्टी केली असून या कारवाईच्या माध्यमातून आता भाऊ, दादा, भाई, प्रेरणास्थान, आधारस्तंभ असलेल्या नेत्यांना इशारा दिला आहे.