बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा

बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा

नाशिक (प्रतिनिधी): बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना बँक खातेदाराची माहिती घेत ऑनलाइन सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

दरम्यान, तिवारी यांचे बंधू एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरू असतानाच तिवारींची फसवणूक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

हे ही वाचा:  अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत: दादा भुसे

रुपेश तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. २३) एचडीएफसी बँकेचा कस्टमर केअर नंबरचा गुगलवर शोध घेतला. याठिकाणी बँकेचा बनावट कस्टमर केअर नंबर मिळाला. या नंबरवर फोन करत ‘बँकने २४७३ रुपये माझ्याकडून जास्त घेतले गेले’ असे तिवारींनी सांगितले असता संशयिताने रक्कम परत करतो असे सांगत अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व आयडी विचारला. तिवारींनी आयडी देताच त्यांचा मोबाइल हॅक करत ४९ हजार रुपये दोनदा व २१ हजार ५५५ असे सुमारे सव्वा लाख रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली.

हे ही वाचा:  नाशिक: बेमोसमी पावसाचा आज 'ऑरेंज अलर्ट'; पावसासह गारपिटीचा इशारा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790