पोलीस अकादमीमध्ये युवकाची आत्महत्या….

नाशिक (प्रतिनिधी) : त्रंबक रोड येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. काल (दि.१६) दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

राहुल दिलबाग दुलगज (१९) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास त्याची आई स्वच्छता करण्यासाठी बाहेर गेली असता राहुलने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्म्हत्येमागील कारण अजून स्पष्ट झाले नाहीये.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790