पत्नीच्या मृत्यूचं वृत्त कळताच पतीचीही आत्महत्या..

नाशिक (प्रतिनिधी): नवरा बायकोचं नातं किती घट्ट असू शकतं याचं एक उदाहरण नाशिक मध्ये समोर आलं आहे. पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हताश झालेल्या पतीने आत्महत्या करत आपलीही जीवनयात्रा संपवली आहे.. ही घटना नाशिकच्या सातपूर परिसरात समोर आली आहे…

सातपुर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर येथील माळी कॉलनी परिसरात पवार कटुंब वास्त्याव्यास आहे. संगीता रवींद्र पवार यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने २९ मार्च रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना मयत संगीता यांच्या मुलाने वडिलांना फोनवरून कळविली. काही वेळाने मुलाने वडिल फोन उचलत नसल्याने शेजाऱ्यांना कळवले, बऱ्याच वेळा आवाज देऊन दरवाजा ठोठावून देखील आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने, नागरिकांनी खिडकीतून डोकावले असता त्यांना रवींद्र तुळशीराम पवार हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

हे ही वाचा:  नाशिक: पोलिसांनी पकडला अवैध मद्यसाठा; शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

पत्नीच्या मृत्यूने हताश होऊन रवींद्र पवार यांनी आत्महत्या केल्याचे समजतेय. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासांत पतीने जीवन यात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790