निवडणूक आणि पैसा: चर्चा करण्याच्या बहाण्याने तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

निवडणूक आणि पैसा: चर्चा करण्याच्या बहाण्याने तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पैसे मागून चर्चा करण्याच्या बहाण्याने तरुणास बोलावून त्याच्यावर सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नानावलीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी समीर रफिक शेख (वय 38, रा. अमरधाम रोड, जुने नाशिक) याला संशयित समीर ऊर्फ बादशहा याने निवडणुकीच्या संबंधाने पैसे मागून चर्चा करण्याच्या बहाण्याने फोन करून नानावली मशिदीजवळ बोलावले.

🔎 हे वाचलं का?:  दूरसंचार आराखडा; कुंभमेळा प्राधिकरणाची प्रमुख दूरसंचार कंपन्यांसोबत बैठक

त्यानंतर चर्चा करून झाल्यानंतर समीर शेख याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने समीर ऊर्फ बादशहा व त्याचे भाऊ रियाज ऊर्फ बोच्या, याकूब शहा (पत्ता माहीत नाही), फिरोज शेख (वय 47, रा.नानावली मशिदीजवळ, जुने नाशिक), आतिक ऊर्फ गेंड्या अन्सारी, शादाब ऊर्फ सदू शेख व इम्रान कुरेशी ऊर्फ गोशवाला, पत्ता माहीत नाही) यांनी त्यांच्याकडील हत्याराने समीर शेखला मारहाण व शिवीगाळ केली,

🔎 हे वाचलं का?:  मनपाची आज महासभा; विकास कामांसह विविध विषयांवर होणार चर्चा

तसेच घातक हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने या सात जणांनी समीर शेखवर प्राणघातक हल्ला केला. यात शेख याच्या डोक्याला व शरीराला मार लागून गंभीर दुखापत केली.

दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790