नाशिक: हॉटेल मिरचीजवळ एसटी बसचे ब्रेक फेल; तत्पर चालकामुळे वाचले प्रवासी

नाशिक: हॉटेल मिरचीजवळ एसटी बसचे ब्रेक फेल; तत्पर चालकामुळे वाचले प्रवासी

नाशिक (प्रतिनिधी): लासलगाव आगारातून सुटलेली लासलगाव- नाशिक सकाळी आठची बस औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्चीजवळून जात असताना, अचानक बसचे ब्रेक फेल झाले.

मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवासी सुरक्षित बचावले.

याच ब्लॅक स्पॉटवर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाशांचा बळी गेला होता.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

ही घटना ताजी असताना, लासलगाव आगराच्या चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली.

लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस साडेनऊच्या सुमारास जात असताना, अचानक हॉटेल मिर्चीजवळ बसचे ब्रेक फेल झाले. चालक पी. व्ही. भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करून बसमधील जवळपास ७५ प्रवाशांना सुरक्षितपणे आडगाव नक्यापर्यंत पोहोचविले. वाहक डी. यु. राठोड यांनी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले. चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी त्या दोघांचे आभार व्यक्त केले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

लासलगाव आगारातील बसेसचा दर्जा अत्यंत खालावला असून, अनेक नादुरुस्त बस रस्त्यावर धावत आहे. कोरोनापूर्वी लासलगाव आगारात ५६ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी होत्या. मात्र, आता फक्त ३४ बसेस आहेत. आगारकडून मागणी करूनही नवीन बस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790