नाशिक: हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलांकडे लक्ष द्या, हौदात पडून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलांकडे लक्ष द्या, हौदात पडून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये चिमुकलीच्या अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती.

चांदवड शहरात अशीच एक घटना समोर आली आहे.  नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात दुर्दैवी घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला आहे. हार्दिक गणेश पारवे असे या मुलाचे नाव आहे.

Nashik Crime: मोबाईलचा वाद भोवला, हातातील रबरी बँडवरून युवकाच्या खुनाचा उलगडा

चांदवड शहरातील रोहिदासनगरमध्ये राहणारा हार्दिक पारवे हा घराच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास खेळत होता. येथील जुन्या पोलिस चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या हौदात तो पडला. परंतु कोणाच्याही हे लक्षात आले नाही. हार्दिक कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

नाशिक: साप चावला तरीही ती स्कुटीवर रुग्णालयात आली, मात्र; आईसमोर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

मात्र तो कुठेही सापडला नाही. रात्री आठच्या सुमारास  पाण्याच्या हौदात पाहिले, असता हार्दिक पाण्यात आढळला. त्याला येथील चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

नाशिक: मौजमजेसाठी विद्यार्थी बनले Mobile Snatcher! मोबाईल खेचणाऱ्या चौघांना पकडले

चांदवड शहरातील रोहिदासनगरमध्ये पारवे कुटुंब वास्तव्यास आहे. चार वर्षाचा हार्दिक सायंकाळी घराजवळ खेळत होता. घरातील कुटुंब आपल्या कामात व्यस्त होते. अशातच बराच वेळ झाला, घरच्यांना हार्दिक आढळून आला नाही. शिवाय अंधारही पडू लागला होता. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र तास-दीड तास होऊनही हार्दिक आढळून आला नाही. शेवटी मागील बाजूसं असलेल्या हौदात बॅटरीच्या साहाय्याने पहिले असता हार्दिक हौदात असल्याचं दिसलं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790