नाशिक हादरलं ! नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून फूस लावून नेत विवाहित तरुणीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): मध्यरेल्वेने नवसारी येथून नाशिक मध्ये आपल्या बहिणीकडे आलेल्या मात्र मध्यरात्र झाल्याने रेल्वेस्थानकावर एकटी थांबलेल्या एका असहाय्य विवाहित तरुणीवर फुस लावून चेहडी शिव परिसरात दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबात नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेतून उतरल्यानंतर एकटी असल्याचा फायदा घेत स्थानकावरील पाणीविक्रेता आणि रिक्षा चालक यांनी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, नाशिकरोड पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित तरुणी ही 19 वर्षाची असून ती नवसारी येथून मुंबई मार्गे नाशिक येथील तिच्या बहिणीकडे येत असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरली.

स्थानकावर उतरल्यानंतर पीडित तरुणीने महिला सहप्रवासीच्या मोबाईलवरून बहिणीला फोन केला, मात्र खूप रात्र झाली असल्याने तू आता येण्याची घाई करु नकोस रेल्वेस्थानकावरच थांबून राहा, सकाळी तुला मी घेण्यास येते असे बहिणीने तिला सांगितले. त्यामुळे पीडितेने कुठलाही धोका न पत्करता रेल्वेस्थानकावरच थांबण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

यादरम्यान रेल्वेस्थानकावरील पाणी विक्रेता संशयित कुणाल पवार याने मदतीचे सोंग करत तिला खाद्यपदार्थ दिले. यावेळी आपला रिक्षा चालक मित्र प्रकाश मुंडे याला बोलावून घेतले. पीडित तरुणीला चेहडी शिव परिसरातील पेरूच्या बागेत नेऊन दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मारहाण करून कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: शतपावली करतांना पाय घसरून नाल्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू...

यावेळी तरुणीने प्रतिकार करत तेथून पळ काढीत आरडा ओरडा केला, तेव्हा शेजारील इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नाशिकरोड पोलिसांनी संबंधित तरुणीला विश्वासात घेऊन आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790