नाशिक हादरलं: गंगापूर पाईपलाईन शिवारात मित्रानेच केली युवकाची हत्या..

नाशिक हादरलं: गंगापूर पाईपलाईन शिवारात मित्रानेच केली युवकाची हत्या..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात खूनसत्र सुरूच आहे.

नाशिकच्या गंगापूर शिवारात पाईपलाईन भागात बुधवारी (१ जून) सकाळी एका युवकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पवन नथू पगारे (वय: २२, सातपूर) असे या युवकाचे नाव आहे. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

शहरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडय़ांचे सत्र कायम असताना त्यामध्ये आता एका पाठोपाठ एक घडलेल्या खुनाच्या घटनांची भर पडली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची ७६ लाखांची फसवणूक

आज सकाळी गंगापूर पाईप लाईन शिवारात आपापसातील वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. पवन पगारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून खुनांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एकामागोमाग घडलेल्या या घटनांनी शहर हादरले आहे. आज सकाळी गंगापूर परिसरातील पाईपलाईन शिवारात पवन पगारे नामक तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा:  Breaking: जुने नाशिकमध्ये जाळपोळ करणाऱ्या पाच जणांना अटक !

विशेष म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आणि संशयित आरोपी हे दोघं मित्र आहेत. हे दोघे काल रात्री सोबत फिरत होते. आणि सकाळी मित्रानेच मित्राची हत्या केली. या हत्येमागील नक्की कारण काय आहे हे आता तपासात उघड होईल.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचे धाडस:
दरम्यान हत्येनंतर संशयित अतुल सिंग हा घटनास्थाळाहून पळून चालला होता. याचवेळी या रस्त्याने महिला पोलीस कर्मचारी सरला विजय खैरनार ह्या आपल्या ड्युटीवर चालल्या होत्या. आणि त्यांनी संशयित आरोपीला हातात चाकू घेऊन पळून जातांना पाहिलं. यावेळी त्यांनी संशयित आरोपीला हटकलं मात्र तो पळू लागला. खैरनार यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडलं आणि आजुबाजूच्या नागरिकांनाही मदतीसाठी बोलावलं. त्यानंतर पोलिसांची टीम दाखल झाली आणि संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group