नाशिक: हरिहर गड १७ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद

नाशिक: हरिहर गड १७ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद; वनविभागाचा निर्णय

नाशिक (प्रतिनिधी): वनविभागाच्या पश्चिम भाग क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरीहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

सततचा होणारा पाऊस आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील  हरिहर गडावर विकेंड निमित्त होणारी गर्दी बघता हरिहर गड पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

१७ जुलै पर्यंत हा गड बंद राहणार आहे.

या दरम्यान कोणतेही पर्यटक या ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वन विभागाकडून देण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

मुंबई, पुणे नंतर आता पर्यटकांची नाशिक जिल्ह्याकडे पाऊले वळली आहेत. जिल्ह्यातील पहिने, अशोका धबधबा, दुगारवाडी येथील उलटा वाहणारा धबधबा कळसुबाई शिखर, हरिहर गड अश्या अनेक निसर्गरम्य स्थळी पर्यटक भेट देत असतात. विकेंडला तर मोठी गर्दी याठिकाणी बघायला मिळते.

प्रत्येक विकेंडला याठिकाणी हजारो पर्यटक हजेरी लावत असतात. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या व्हाराल होत आहेत. हा किल्ला डोंगरावर १७० मीटर उंचीवर असून एक मीटर रुंद आहे.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

हरिहर गडावर विकेंड ला पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पर्यटकांची मोठी गर्दी बघता अपघात होण्याची शक्यता असते. त्यात गेल्या सहा दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाने गड चढत असताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकरिता तीन दिवस (१७ जुलै पर्यंत) हरिहर गड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्याचा आदेश वन विभाकडून देण्यात आला आहे. मनाई आदेश असताना गडावर पर्यटक दिसून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना १७ जुलै पर्यंत हरिहर गडावर न येण्याचे आवाहन वन विभागा कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group