नाशिक: स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून डोक्यात फावडं मारून पत्नीची हत्या
नाशिक (प्रतिनिधी): स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने मारून ही हत्या केली.
या घटनेत पतीसह पाच लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
तर आडगाव पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे .
नाशिक औरंगाबाद रोड येथील माडसांगवी येथील रहाणाऱ्या विशाल कापसे याने काल रात्री राहत्या घरी पत्नी आरतीची हत्या केली आहे. आरतीचा विशाल बरोबर 2016 मध्ये विवाह झाला होता. विशाल आणि आरतीला 3 मुलं आहेत. लग्न झाल्यापासून नेहमी दोघांमध्ये वाद होत होते. काल त्यांचा वाद विकोपाला गेला आणि त्यात आरतीची हत्या करण्यात आली.
- नाशिक: दुभाजकाला दुचाकी धडकून चालक ठार, दोन जखमी
- धक्कादायक: मोबाईल गेमच्या आहारी जाऊन नाशिकला चौथीतल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
- Breaking: संपूर्ण नाशिक शहरात ह्या दोन दिवशी पाणीपुरवठा नाही…
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती विशाल कापसे (वय २४, रा.माळवाडी माडसांगवी, ता.जि.नाशिक ) हिला तिच्या सासरच्यांनी मागील भांडणाची कुरापत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिचा पती विशाल याने त्याच्या घराजवळ पडलेल्या लोखंडी फावडा उचलून आरतीच्या डोक्यावर व तोंडावर मारून तिला गंभीर जखमी करून ठार केले.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे, विशाल राजाराम कापसे (सर्व रा.माळवाडी माडसांगवी ता.जि.नाशिक ) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी इरफान शेख करत आहेत.