नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: सेंट्रल जेल अधीक्षकाच्या मुलाला मारहाण; मारेकरी फरार
नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड येथे शिवाजीनगरला कारागृह अधीक्षकाच्या मुलाला मारहाण केल्यामुळे एकच खळबल उडाली आहे.
शिवाजीनगर येथील पान टपरीवर पान घेण्यासाठी गेलेल्या युवकाला पानपट्टी चालक व त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण करून गजाने नाकाचे हाड फ्रैक्चर केले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक प्रमोद वाघ यांचा मुलगा आदित्य प्रमोद वाघ हा गेल्या शनिवारी रात्री अकराला दुचाकीवर जेलरोड शिवाजी नगर येथे अमित बोराडे याच्या पानपट्टीवर पान घेण्यासाठी गेला होता.
आदित्याने दोन साधे पान घेतल्यानंतर किती पैसे झाले, अशी विचारणा केली असता पानपट्टी चालकाने सत्तर रुपये मागितले. यावेळी आदित्य याने दोन साध्या पानाचे इतके पैसे झाले का, अशी विचारणा केली असता बोराडे याने शिवीगाळ करत पान घ्यायचे तर घे नाही तर तिकडेच जा, असे म्हटले.
त्यावेळी आदित्याने शिव्या का देतो, अशी विचारणा केली असता बोराडे याने पानपट्टीच्या बाजूला असलेल्या मित्रांना बोलावले. त्याच्या मित्रांनी टपरीतून गज काढून आदित्याच्या नाकावर व खांद्यावर मारून गंभीर दुखापत केली. एक जणाने हातातील कडे आदित्यच्या डोक्यात मारले. तर सात आठ जणांनी आदित्यला लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
आदित्यने आपल्या आईला फोनवरून सर्व प्रकार सांगितला असता त्याची आई तत्काळ घटनास्थळी आली. यावेळी अमित बोराडेने आदित्यच्या आईला शिवीगाळ केली. मारहाणीत आदित्यचे नाक फ्रेंक्चर झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध आहेत.