नाशिक: सुराणा दाम्पत्यावर अजुन एक गुन्हा: अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले…

नाशिक: सुराणा दाम्पत्यावर अजुन एक गुन्हा: अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले…

नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या योग वेलनेस स्पा सेंटरमध्ये एका अल्पवयीन पीडितेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

टिळकवाडी सिग्नलजवळ असलेल्या वेलनेस स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात परेश सुराणा, खुशबू सुराणा व एक अनोळखी इसम या तिघांविरुद्ध पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

संशयित दांम्पत्याविरोधात वेगवेगळ््या पोलिस ठाण्यात फसवणुकीसह पिटाअंतर्गत गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिस ठाण्यात याचप्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कामाच्या शोधात असलेल्या या पीडितेला १ मार्च २०२३ रोजी टिळकवाडी सिग्नल परिसरात योगा वेलनेस स्पा येथे कामासाठी मुली पाहिजे असल्याचे फलक दिसला.

तिने त्यासाठी गेली असता संशयित खुशबू सुराणा हिने साफसफाईचे काम असल्याचे सांगत २ मार्चला ती कामासाठी स्पामध्ये गेली असता, त्यावेळी संशयित खुशबू हिने ज्युस पिण्यासाठी दिले. त्यामध्ये गुंगीचे औषध असल्याने जरावेळातच पीडिता बेशुद्‌ध झाली.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

शुद्धीवर आली त्यावेळी एका रुममध्ये ती नग्न अवस्थेत होती. संशयित खुशबू हिने तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवून तिला व्हायरल करण्याची धमकी देत जे सांगेल तसे करावे लागेल अशी धमकी दिली.

त्यानंतर अज्ञात इसमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. सदरची घटना भितीपोटी तिने घरी दडवून ठेवली. अखेरिस गेल्या १७ मे रोजी आईला घडलेली घटना सांगितल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिसात धाव घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group