सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला आग; लाखो रुपयांचे नुकसान
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली होती.
या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , बुधवारी (दि.२) पहाटे ५ ते ५: ३० वाजेच्या दरम्यान सदर कंपनीला आग लागली होती.
महानगर पालिकेच्या अग्निशमन दलास संपर्क केला असता, अग्निशमन दलाचे ३ बंब, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा १ बंब, एमआयडीसी चा १ बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. सकाळी ८ वाजेपर्यंत आग विझवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सकाळी १० वाजेपर्यंत सदर ठिकाणी कुलिंग चे काम सुरू होते.या आगी मध्ये पहिला मजला संपूर्ण जळून खाक झाला आहे.
कॅपॅसिटर बनवण्यास लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल जाळून खाक झाला आहे. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. यावेळी नाशिक मनपा अग्निशमन केंद्र प्रमुख राजेंद्र बैरागी, व पी.जी परदेशी, आर.ए लाड यांच्या एकूण २५ कर्मचारी आग विजवण्याचे काम केले.