नाशिक: सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; विद्यार्थी जखमी

नाशिक: सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; विद्यार्थी जखमी

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाट रस्त्यात रविवार (ता.२२) सकाळी १२ वाजे दरम्यान विश्राम गडावरून टाकेद नाशिक च्या दिशेने निघालेल्या शैक्षणिक सहलीच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.

सदर अपघाताबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शहाबाज शेख यांनी एसएमबीटी रुग्णालयातील व्यवस्थापक सूरज कडलग यांना संपर्क केला.

आणि तत्काळ एसएमबीटी रुग्णालयाकडून घटनास्थळी दोन कार्डेक रुग्णावाहिका पाठविण्यात आल्या.

तोपर्यंत जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवा फोडसे ,अमोल धादवड यांच्या टीम ने स्थानिक ग्रामस्थ प्रवासी वाहनधारकांनी बाहेर काढले.

इस्कॉन मंदिर संस्थेतर्फे जवळपास चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर आले होते. त्यानंतर ते विश्रामगड (पट्टाकिल्ला) भेट देऊन आले. येतांना परतीच्या प्रवासात नाशिक नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबा जवळ गाडीचे ब्रेक फेल झाले.

बस चालकाने प्रसंगावधान राखताच चालकाने गाडी दरीत जाऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कडेला गाडी घसरवली यात गाडी पलटी झाली. त्यानंतर डोंगराच्या बाजूला गाडी पलटी झाल्यानंतर दहा विद्यार्थी किरकोळ तर चार जण गंभीर जखमी झाले.

जखमींसह सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर एसएमबीटी रुग्णालयाकडून सूरज कडलग यांनी दोन मोठ्या कार्डेक रुग्णवाहिका घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल केल्या व एस एम बी टी रुग्णालयात अपघात विभाग कक्षात सर्व डॉक्टर नर्स कर्मचारी वर्गासह बेड सह टीम सज्ज ठेवली. जखमींना रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार चालू केले.

चालकाच्या प्रसंगावधनतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. पोलीस प्रशासनाला सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अनिल धुमसे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे,बी पी राऊत,सुहास गोसावी,आर पी लहामटे,केशव बसते, आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व क्रेन बोलावून पुढील कार्यवाही केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790